कुंपण
नसेल जिथे दुःखास स्पर्श
नसेल कुठला आघात – प्रघात
जावे वाटे अशा ठिकाणी ,दूर
सर्वांपासून लांब एकांतात..
रोजच इथं घडी – घडीला
वेदना , व्याकुळता, घुसमट
त्यासवेच लढता लढता इथं
सार्याचीच होत असते घुसमट..
दाखवली जाते माणुसकी ,पण
घेण्यास स्वाभिमान आडवा येतो
न ती घ्यावी तर परिस्थिती ने
व्यथेने मनाचा कोंडमारा होतो..
वाटे शेवटी असंही, कि नसावं कुणी
परिचित , ना आपलं ओळखीचं
कधीही ना मग दुखावेल मन , ना आपलं
ना कुणाचंच , असंच असावं आपलं कुंपण..||
वर्षा मेहेंदर्गे, आकुर्ली,
नवीन पनवेल







Be First to Comment