Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज १६ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १६ जण सापडले आहेत. ११ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १८६५, उपचार करून बरे झालेले १६२१, उपचार घेणारे १४९, मयत ९५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज वाणीआळी २, जांभूळपाडा १, जेएनपीटी ४, कोंढरीपाडा करंजा १, आवरे १, मांगीरदेव झोपडपट्टी १, कामठा १, नागाव १, डोंगरी १, करंजा श्रीयोग नगर १, जासई १, केगाव १ असे एकूण १६ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर वशेणी १, डाऊर नगर १, केगाव १, उरण १, साई निकेतन २, जेएनपीटी २, म्हातवली १, ओएनजीसी १, रानसई १ असे एकूण ११ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.

उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कधी कमी तर कधी जास्त प्रादुर्भाव जाणवतो. उपचार करून घरी परतण्याचा आकडाही जास्त आहे. त्याचबरोबर मयताचा आकडाही कमी जास्त होताना दिसतो. म्हणूनच उरणच्या जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.