Press "Enter" to skip to content

महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा

जेष्ठ पत्रकार संतोष घरटकर यांचे चिरंजीव यश घरटकर यांची चित्रकलेतुन ऊंच भरारी 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशील सावंत 🔷🔶🔶🔷

महाडची भूमी ही क्रांतिकारी व शौर्याची भूमी आहे. महाडची थोरवी जगभरात आहेच. मात्र आज महाडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाडमधील नावजलेले जेष्ठ पत्रकार संतोष घरटकर यांचे चिरंजीव यश घरटकर हे हुबेहुब चित्र काढतात. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती .

महाड तालुक्यातील लाडवली येथील नवयुग विद्यापीठ या शाळेमध्ये 10 वि पर्यंत शिक्षण घेतले व लहानणापासुच यश घरटकर याला या चित्रकलेचा वेगळाच छंद होता . त्याने चित्रकलेचे शिक्षण घेतले नाही, मात्र एखादे चित्र समोर आले की ते हुबेहूब रेखाटण्याचे कसब त्याच्याकडे आहे.

आज त्याच्याकडे चित्रांचा खजिना आहे. प्रत्येकाच एक स्वप्न असते, मोठेपणी काय तरी बनायच पण यशला एक चित्रकलेची अमूल्य देणगी मिळाली आहे. यश ला मुंबईतील जे जे आर्ट मध्ये ऍडमिशन घ्यायच आहे, त्याची तयारी जोरात चालु आहे. त्यानी आजपर्यंत अभिनेते क्रिकेटर राजकारणी या लोकांचे विविध चित्र त्याने आजपर्यंत काढले त्याला वेगवेगळ्या सन्मान चिन्ह देऊन त्याला गौरवण्यात आले आहे. त्याच्या वडिलांनी त्याला आजपर्यंत खुप साथ दिली व पुढेही यश घरटकर हा महाडच नाव उंचावर नेईल असे महाडकर जनतेला विश्वास आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.