सिटी बेल लाइव्ह / रोहे (नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के) 🔶🔶🔷🔷
प्रचंड दुर्दशा झालेल्या व मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेल्या रोहा-कोलाड व रोहा-चणेरा या दोन्ही मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी यासाठी किंग ग्रुपचे आँफ महाराष्ट्र रोहा यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले आहे.
गत वर्षाप्रमाणे याही वर्षी चालू पावसाळी हंगामात या दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गाला मोठमोठ्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या दोन्ही मार्गावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत ब-याचवेळी छोटे मोठे अपघातही घडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन्ही मार्गाची दुरवस्था ही कायमस्वरूपी तशीच असल्याने काहीभागात दिवसेंदिवस मार्गावरील डांबर व खडीचे प्रमाणही कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
प्रवासी वर्ग व वाहनचालक यांना सोसाव्या लागणा-या नरकयातना कुठेतरी कमी होऊन थोडाफार दिलासा मिळावा यासाठी रोहा किंग ग्रुपचे वतीने सदरचे निवेदन देण्यात आले असून निवेदनाची दखल न घेतल्यास किंग ग्रुप आँफ रोहा व स्थानिक नागरिक यांच्याकडून आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी अक्षय जाधव,दीप वायडेकर,सागर भगत,अनूज पाडसे,अविनाश शिंदे,साहिल साळुंखे, विघ्नेश वाडकर,समीर मळेकर आदी किंग ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment