सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔶🔷🔷🔶
शेती हा अर्थशास्त्राचा कणा असे संबोधले जात आहे.यामुळे शेती करुन शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढवावे,यासाठी शेतकऱ्यांना शेतीची औजारे चांगल्या प्रतीची मिळावे,शिवाय शेतकरी शेतीमध्ये जास्तीत जास्त लक्ष वेधून शेती करावी त्याच बरोबर विविध पिके घ्यावी यासाठी लागणारे औजारे त्यांच्या मार्फत थेट नियोजित वेळेत पोहचविण्यासाठी कृषि यांत्रिकीकरण सन २०२० – २१ साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,ज्या शेतकरी वर्गांना कृषी औजारे घ्यावयांची असल्यास त्यांनी राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टल वर इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज भरावेत असे आवाहन खालापूर तालुका कृषी अधिकारी/ उप विभागीय कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कृषि उन्नती योजन साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून. सन २०२०-२१ करीता ज्या शेतक-यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर (गवत कापणी यंत्र) व इतर कृषि औजारे घ्यायची आहेत. त्यांनी राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टल वर इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज भरावेत असे आवाहन कृषी खात्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.ह्या पोर्टल वर जावून फॉर्म २९ रुपये ५० पैसे शुल्क आकारले आहे.तसेच सर्व शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार लिंक असणे अनिवार्य असल्यांचे त्यांनी सांगितले.फॉर्म भरतेवेळी शेतकर्त्यांजवळ आधार कार्ड, ७/१२ व ८ अ असणे गरजेचं आहे.
तसेच जो मोबाईल नंबर आधारकार्ड शी लिंक आहे.तो मोबाईल सोबत असावा. कारण आपण फॉर्म भरत असतांना २ ओटीपी हे त्याच मोबाईल नंबर वर जातात आणि त्यांची वेळ फक्त २ मिनिट असते.जर दोन मिनिटात तुम्ही ओटीपी नाही टाकला, तर पुन्हा नवीन ओटीपी पाठवावे लागते.किंवा कृषी विभागाच्या इतर कोणत्याही योजनेत सहभाग घ्यायचा आहे.अशा शेतक-यांनी स्वतः किवा आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा त्यासाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, ७/१२, ८ अ (खाते उतारा) , एस.सी., एस.टी. असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे
टिप:- अर्जदार यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यास Pancard नंबर किंवा मतदान कार्ड नंबर लागतो https://mahadbtmahait.gov.in/
https://mahadbtmahait.gov.in/farmer/login
या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत.तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी अर्चना नारनवर,मंडळ कृषी अधिकारी साळके,कृषी साहाय्यक चौधरी सर,नितिन महाडीक,मात्मा बीटीएम – प्रज्ञा पाटील अदि यांनी या वेबसाईट विषयी सांगितले.








Be First to Comment