Press "Enter" to skip to content

बेहिशोबी वीज बिलांच्या निषेधार्थ किशोर म्हात्रे यांचा उपोषणाचा इशारा

विद्युत मंडळाकडून येत असलेले वाढीव विज बिल दुरुस्त करण्याची मागणी 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून अव्वाच्या-सवा विज बिल आकारले जात असल्यामुळे प्रत्येक महिन्यात येत असलेल्या वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढीव वीज बिल दुरुस्त न केल्यास सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीच्या पाली येथील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाली कार्यालयातील उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात किशोरभाई म्हात्रे यांनी म्हटले आहे की, कोरोना सारख्या महामारीमुळे गोरगरीब जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून गोर गरीब आदिवासी बांधव व सर्वसामान्य नागरिक यांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील मुश्कीलीचे झाले आहे.

असे असताना दरमहा पाचशे रुपये प्रमाणे येणारे विज बिल सहा महिन्यात सहा ते आठ हजार आले आहे. सर्व सामान्य गरीब जनता हे वाढीव विज बिल कुठून भरणार ? म्हणून विद्युत मंडळाकडून विज बिल योग्य पद्धतीने दुरस्ती न करून दिल्यास सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीच्या पाली येथील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.