Press "Enter" to skip to content

उदास मन

उदास मन

उदास मना, सांगू कोणा?
प्रेम सुकले, सुकले
आशा तुटली, तुटली
निराशेच्या वादळाने घेरले
दिन मावळतीस गेला
जणू घटना लोप पावल्या
काळाने जगणे हिरावले
विश्वास शब्दही हरवला
मनी आदर्श रूप संपले
क्षणी जीवन शून्यरुप झाले
शांतताही भयाण झाली
कोलाहल मनी माजले
कर्तव्याने जणू पाप वाढले
जगही निराश भासले
जीवनरात्र काळोखी झाली
चांदण्यांची शीतलता भाजू लागली
जगू कसे? पाहू कसे?
सर्वच मलीन वाटले
आज आठवणही नकोशी वाटू लागली…

श्वेता जोशी, नवीन पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.