सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
निवृत्त लष्करी सैनिकाच्या शेतजमीनीतील चारशे ब्रास माती चोरून नेणा-या परेश दरेकर आणि सूरज बूरूमकर(रा.होराळे,खालापूर)या दोघां विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोयना परखंदे येथे राहणारे निवृत्त सैनिक दादासाहेब आबाजीराव मोरे यांची मालकीचे होराळे गावच्या हद्दीतील शेतजमिन सर्वे नं. 57/4 या जमिनीमध्ये बेकायदा अतिक्रमण करून जमिनीतील माती जेसीबीच्या साह्याने काढण्याचा प्रकार घङला होता.जवळपास 2लाख रूपये किंमतीची चारशे ब्रास माती मोरे यांची परवानगी न घेता सूरज आणि परेशने काढली होती.याबाबत मोरे यानी दोघांविरोधात शेतातील माती लबाडीच्या हेतुने स्वतःचे फायदयाकरीता चोरी करुन नुकसान केल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दिली.
पोलीसांनी परेश व सूरज विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार जे पी म्हात्रे हे करीत आहेत.









Be First to Comment