Press "Enter" to skip to content

लॉकडाउन काळात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकारावर १०० यशस्वी शल्यचिकित्सा

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी : 🔶🔷🔷🔶

मार्च ते सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबई नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे शंभरहून अधिक हृदयशल्यचिकीत्सा झाल्या असून इमर्जन्सी मध्ये आलेल्या ५० हृदयविकारग्रस्तांना जीवनदान मिळाले आहे.

लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या भीतीने अनेक नागरिक इतर आजारांवर उपचार करण्यास पुढे येत नव्हते व अशा नागरिकांना हृदयविकाराची ठळक लक्षणे आढळून आली तरी त्याना अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास अनेक अडचणी येत होत्या. लॉकडाउनच्या काळात हृदयविकार रुग्णाची परवड होऊ नये यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या हृदयविकार उपचार केंद्रांमध्ये विशेष पथक स्थापन केले होते यामध्ये तज्ञ डॉक्टर नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ हे खास याच विभागांसाठी नेमले होते. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयशल्यविशारद व तज्ञ  डॉ महेश घोगरे सांगतात, ” हृदयविकाराच्या आजारावर जर तात्काळ उपचार मिळाले नाहीत तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

कोरोना या महामारीचे आगमन भारतात झाल्यानंतर यावर उपचार करण्यासाठी व कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपल्या सर्वांचीच प्राथमिकता दिसून आली परंतु त्यासोबतच अनेक इतर जीवघेण्या आजारांवर अजाणतेपणी  दुर्लक्ष झाले म्हणुनच आम्ही या  सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचा हृदयशल्यचिकित्सा विभाग २४ तास सुरु ठेवला होता. आमच्याकडे नवी मुंबई, उरण , पनवेल रायगड तसेच अनेक रुग्ण मुंबई वरून पण आले होते. २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो परंत मला आनंदाने सांगावेसे वाटते की आमची  संपूर्ण टीम हा हृदय दिन गेली सहा महिने साजरा करीत आहोत.

या लॉकडाउन काळामध्ये आमच्याकडे असे अनेक रुग्ण आले होती की ज्यांच्या उपचारास थोडासा जरी विलंब झाला असता तर ते त्यांच्या जीवावर बेतले असते. हृदयविकार झालेल्या रुग्णांवर शल्य चिकित्सा झाल्यानंतर त्यांना कोरोना पासून दूर ठेवणे ही सर्वात कठीण काम असते. नवी मुंबई महानगर पालिकेने आखून दिलेल्या सूचनेचे आम्ही तंतोतंत पालन केल्यामुळे आमच्याकडे हृदयविकारावरील उपचारासाठी आलेल्या एकाही रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. “

हृदयविकार असणाऱ्या रूग्णांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका हा सर्वाधिक असतो. या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्गाची लागण होऊ शकते. परंतु, भितीमुळे अनेक रूग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास टाळाटाळ करतात. वेळीच शस्त्रक्रिया न झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. याशिवाय शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षायादीवर असताना गुतांगुत अधिक वाटू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अत्यंत गरज असल्यास हृदयावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. कोविड-१९ प्रोटोकॉल नुसार तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये लॉकडाउन झाल्यावर तसेच अनलॉक झाल्यानंतरही हृदयशल्यचिकित्सा यशस्वीपणे सुरु आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.