सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
खोपटे गावातील विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोविंद म्हात्रे यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली.
खोपटे बांधपाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, खोपटे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे खजिनदार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोनची भाग शाळा खोपटे कमिटीचे सदस्य, खोपटे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते.
नागरीकांच्या समस्या सोडविण्यात ते नेहमीच पुढे असत. गावात न्यायनिवाडा करुन सहकार्य करत. ते उत्कृष्ट हॉलिबॉल खेळाडू म्हणून उरण तालुक्यात सुपरीचीत होते.
त्यांच्या जाण्याने खोपटे गावावर,म्हात्रे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
त्यांना खोपटे ग्रामस्थांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांचे दशक्रिया विधी दिनांक १ ऑक्टोबर रोजी तर दिवस कार्य बांधपाडा येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहेत.









Be First to Comment