Press "Enter" to skip to content

सिगारेट ओढायची आहे?मग आता पाकीट घ्यावे लागेल

सिगारेट ओढणे आता पडणार महाग : सिगारेट बिडी च्या खुल्या विक्री वर बंदी 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाईव्ह / मुंबई 🔶🔷🔷🔶

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली. तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे.

हाती आलेल्या वृत्तानूसार, राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.

सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ हा साध्य होतो. मात्र तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ई- सिगारेटवरही केंद्र सरकारने घातली आहे बंदी-

केंद्र सरकारने याआधी ‘ई-सिगारेट’चे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा केली होती. धूम्रपान रोखण्यासाठीचा पर्याय म्हणून ‘ई-सिगारेट’कडे पाहिले जात होते; परंतु, त्यात अपयश आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.