Press "Enter" to skip to content

माझे कुटुंब माझी जबाबदारीचे वाजत आहे तीन तेरा

बाजार पेठेच्या ठिकाणी गर्दिची जत्रा  🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔶🔶🔷🔷

शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे. गेले काही महिने कोरोना सारख्या विषाणू यांनी अनेकांना भयभीत करून सोडले आहे.काही आपला जिव गमवावा लागला रोजच्या रोज कितीतरी कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे.प्रत्येकांने आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपणच स्विकारून मीच माझा रक्षक ब्रीद वाक्य अमलात आणून आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

मात्र महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन होतच नाही.आजही बाजार पेठेत नागरिकांची गर्दी मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे.घराण्यातील सदस्याला जर कोरोनांची लागण झाली तर संपूर्ण कुटुंब धोक्यात येण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही.

कोरोना सारखे संकट आपल्यासाठी आपल्या कुटुंब आणी गावासाठी किती धोकादायक आहे हे माहित असतांना सुद्धा बाजार पेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्मिती होत आहे. खरेदीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोठी गर्दी करीत आहे.कोरोना सारखा आजार आपण बाहेरून घरात घेवून येत आहे.यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यामध्ये आपणच फेल ठरत आहे.यामुळे अति महत्त्वाचे काम असल्यास आपण घराबाहेर जाण्यास काही हरकत नाही मात्र घरामध्ये बसून कंटाळा आला म्हणून थोडा बाजार पेठेत जावून येतो.कोरोना काही नाही असे काही जणांचे मत आहे.मात्र हा आजार गंभीर आहे प्रत्येकांनी थोडा सयंम पाळणे गरजेचे आहे.

             शासनांने लावून दिलेल्या सुचनेचे पालन करुन आपल्या आपण स्वता सुरक्षित राहून दुसऱ्याला सुद्धा सुरक्षित राहण्याचा संदेश दिला पाहिजे.प्रत्येकाला कुटुंब आहे.यामुळे कोरोना सारख्या आजाराला बळी पडण्याच्या अगोदर स्वताला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.