Press "Enter" to skip to content

कृष्णकिनारा

कृष्णकिनारा

तो एक सहारा असतो
वादळवेड्या वाऱ्यात
शांततेत सोबत करते
ती कृष्णकिनारी वाट…

रात्री मध्याच्या समयी
ती जाग अचानक येते
तव मूर्ती डोळा दिसता
जगण्याची ग्वाही देते…

मग पहाट होता होता
स्वप्नात तुझे पाऊल
वाजते बासरी ,पावा
सावळी निळी चाहूल…

मी कृष्णमंदिरी जाता
सकाळच्या त्या पारी
दाटते अनामिक वेडी
राधेची तगमग सारी…

भर उन्हात माधान्याच्या
अंगात ज्वारही भरतो
अन कृष्ण येऊनि माझा
हलका शिडकावा झरतो…

ती फसवी संध्याकाळ
मन हलते कातरवेळी
मग कृष्णसावळी बाधा
सावरे अश्या त्या वेळी…

एॅड्. सायली गोखले, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.