दारू पिऊन पत्नी करते पतीला मारहाण : बिच्चाऱ्या पतीची पोलीसांकडे धाव 🔶🔶🔷🔷
दारुच्या नशेत तर्राट होऊन बायको मारहाण करते, अशी तक्रार करत एका तरुणाने पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
हा प्रकार अहमदाबादजवळील मणिनगर येथे घडला आहे. खोकरा पोलीस स्टेशनमध्ये एका विवाहित पुरुषानं गुरुवारी पत्नी मारहाण करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. पतीची ही तक्रार ऐकून पोलिसही आश्चर्यचकीत झाले.
२९ वर्षीय व्यक्तीचे २५ वर्षीय मुलीसोबत मार्च २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी पत्नीच्या दारुच्या व्यसनाबद्दल पतीला कोणतीही कल्पना नव्हती. पण लग्नानंतर पत्नी सतत दारु पिऊन घरांमध्ये गोंधळ घालू लागली. पत्नीचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून पतीने अनेक प्रयत्न केले.
मात्र, याला पत्नीची साथ नव्हती. दिवसेंदिवस पत्नीचं दारुचं व्यसन वाढतच गेलं. दारु पिल्यानंतर सासू सासऱ्यालाही मारहाण अन् शिव्यागाळ करु लागली. त्यामुळे त्यानं आई-वडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तरिही स्नेहाची सवय सुटली नाही.
त्याच्या आई वडिलांना जूनमध्ये करोनाची लागण झाली. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्याकडे येऊन राहू लागला. त्यानंतर पत्नीही त्याच्यापाठोपाठ तिथे आली व घराच्या वरच्या माळ्यावर राहू लागली. त्यानंतर पुन्हा तिने दारू पिऊन रवी व त्याच्या पालकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच काही दिवसांपूर्वी दारुच्या नशेत ऑफिसमध्ये आली होती. त्यावेळी मला ऑफिसबाहेर बोलवून घेतलं अन् गोंधळ घातल्याचं पतीने तक्रारीत म्हटलेय.
काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात घरघुती हिंसाचाराची तक्रार केली होती. पत्नी आपल्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवू शकते म्हणून पतीने खोकरा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करत सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.
Be First to Comment