जुगाराप्रमाणे याकडे देखील लक्ष देण्याचे पोलीस खात्याला आव्हान ! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔶🔷🔶🔷
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल क्रिकेटचे सामने दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी दुबई येथे चालू होतं आहेत . क्रिकेट खेळाडूंना करोडोच्या भावात विकत घेऊन २० – २० ओव्हर्स या मॅचमध्ये खेळले जातात . एकूण आठ संघ आयपीएल मध्ये खेळवले जाणार आहेत . या स्पर्धेवर करोडो रुपयांचा सट्टा दरवर्षी संपूर्ण देशात खेळला जात असताना कर्जतमध्ये देखील याचे बुकी असल्याचे ऐकीवात असून येथेही काही लाखांचा सट्टा खेळला जात असल्याची कुजबुज आहे.
मात्र आजपर्यंत या बुकींना पोलीस यंत्रणेने पकडले नसल्याने हे बुकी कोण ? हा प्रश्न अद्यापपर्यंत तरी अधांतरी आहे . जुगाराप्रमाणे आयपीएल सट्टा घेणाऱ्या बुकींच्या अड्डयांवर धाडी टाकण्याचे आव्हान येथील पोलीस यंत्रणेवर असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सतर्क होऊन कारवाईचे आदेश कर्जत पोलीस यंत्रणेला देणे गरजेचे असल्याची चर्चा सध्या येथे होत असताना दिसत आहे .
नुकताच गणपती उत्सवात जुगार खेळणाऱ्या अनेकांना रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या आदेशाने कर्जतमध्ये त्याचप्रमाणे संपूर्ण रायगडात धाडी टाकून पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना आत्ता आयपीएल क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत .
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० असे ५० दिवस ६० सामने खेळले जाणार असून एकूण आठ संघ आहेत . या खेळावर देशात सट्टा खेळला जातो , हे अनेकदा मुंबईमध्ये सट्टा घेणाऱ्या बुकींना पकडल्याने उघडकीस आले आहे .
मुंबईप्रमाणे कर्जतमध्ये देखील सट्टा घेणारे बुकी असल्याची चर्चा आहे . क्रिकेट स्पर्धेत कुठला संघ जिंकणार , कोण हरणार , कोण आउट होणार , अखेरच्या स्पर्धेत तर छकडी मारण्यावर देखील सट्टा खेळला जातो . मुंबई – पुण्याचा मध्य असलेल्या कर्जत शहरात देखील अनेक छुपे बुकी सट्टा घेत असल्याची चर्चा प्रत्येक आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी येथे होत असून हा सट्टा काही लाखांच्या घरात खेळला जात असल्याची चर्चा आहे , करोडो रुपयांची उलाढाल या सामान्यांवर होते त्यामुळे अशा सट्टेबहाद्दूर बुकींना पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेवर आहे .
रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सतर्क होऊन सट्टेबाज बुकींना पकडून आयपीएल क्रिकेट खेळावर खेळला जाणारा करोडो रुपयांचा बेकायदेशीर सट्टाबाजार उध्वस्त करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .







Be First to Comment