Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे

मुंबई-गोवा महामार्गाची जलद दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार : संदीप ठाकूर यांचा इशारा ###

सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत ###

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळ्यात महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. जनतेचे अतोनात हाल होत आहेत. महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम येत्या आठवडाभरात पूर्ण न केल्यास मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा गर्भित इशारा मनसेचे रायगड जिल्हा संघटक संदीप ठाकूर यांनी दिला आहे. मागील कित्येक वर्षे या महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे. या महामार्गाने कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतलेत. प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आले आहे. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप मनसेने केलाय. या महामार्गाच्या दर्जाकडे कुणाचे लक्ष नाही. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येते. जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी केवळ खडी टाकून तात्पुरती डागडुजी केल्याने दुचाकीस्वार त्याच्यावरुन घसरून अपघात होत आहेत.यात अनेक चालक मृत्युमुखी पडले आहेत. महामार्गावर कोणतीही सुरक्षा बाळगली जात नाही. महामार्ग असुरक्षित झाला आहे . प्रवाशी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत गांभीर्याने विचार करून जवळच आलेल्या गणपती उत्सवानिमित्त सदर रस्त्यावरून होणारी कोकणातील चाकरमान्यांची वाहतूक लक्षात घेता तातडीने सदर रस्त्याची दुरुस्ती चांगल्या प्रकारे करण्यात यावी. येत्या आठ दिवसात या कामात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलाय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.