
सिटी बेल लाइव्ह/काव्य कट्टा
*कोरोनाची लढाई*
कोरोना विरूद्धची लढाई
आपली आपणच लढवू या
कोरोनावर मात करायला
धैर्य अंगी बाणवू या || १ ||
कदापी हा न संपणारा
महाभयंकर रोग असे हा
या रोगाला हटवायाला
कंबर आता कसू या || २ ||
आपले शासन असे भक्कम
साथ त्यांना देऊ या
सहकार्य आपले नित्य ठेऊनी
साथ आपली देऊ या || ३ ||
वाढता वाढे कोरोनाचा आजार
थांबण्याचे नावही नसे
सुरक्षिततेची कास धरूनी
दूर राहायला शिकू या || ४ ||
नका बाळगू व्यर्थ भिती
या कोरोना व्हायरसची
लढण्यासाठी हवी साथ
सद्रुढ शरीराची || ५ ||
कवी-नंदकुमार मरवडे*, *श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी*, *ता.रोहा-जि.रायगड*. ◆◆◆◆◆◆◆






Be First to Comment