Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचायत कोरोना कक्षातील कर्मचाऱ्यांचा सन्मान

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ###

सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार ) ###

रायगड_रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार लोकनेते सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्राम पंचायत गोवे यांच्याकडून कोरोना कक्षातील कर्मचाऱ्यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे,आशा परिस्थिती ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनिस,आशा सेविका, पोलीस पाटील,यांना सन्मानपत्र मानधन देऊन तर ग्रामसेवक,तलाठी,कृषि अधिकारी,आणि जि. प.शिक्षक वर्ग यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून गौवरविण्यात आले आहे. यावेळी गोवे ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया जाधव,उपसरपंच अंजली पिंपळकर, ग्रामसे गोविंद शिद सदस्य ,नरेंद्र जाधव,नथु शिंदे,संदेश कापसे,रुपाली पोटफोडे ,रजीता जाधव,रजनी गायकवाड,संदेश झोलगे,संदीप जाधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.