Press "Enter" to skip to content

आ. अनिकेत यांच्या हस्ते ऐनघर ग्रामपंचायतीमधील कोरोना योद्धांना आर्थिक मदत

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवास पवार यांचा उपक्रम ###

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ###

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या जागतिक महामारीच्या व आपत्तीच्या काळातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धैर्याने सामोरेजाऊन अहोरात्र कार्य करणाऱ्या नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस या सर्व कोरोना योद्धांचा विशेष मानपत्र देऊन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवक राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय अध्यक्ष निवास पवार यांच्या वतीने सुमारे २२ कोरोना योद्धांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी नागोठ्ण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचाही कोविड योद्ध म्हणून सत्कार करण्यात आला.

ऐनघर ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह ऐनघर विभागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहन पवार, तानाजी लाड, यशवंत हळदे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, नागोठणे विभाग अध्यक्ष निवास पवार, ऐनघरचे सरपंच चंद्रकांत शिद, ग्रा.पं. सदस्य मनोहर सुटे, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, जितेंद्र धामणसे, मंगेश जाधव, अशोक कापसे, युवक राष्ट्रवादीचे रोहा तालुका उपाध्यक्ष दीपेंद्र आवाद, वणी ग्रामपांचायतीच्या सरपंच प्रगती आवाद, कृष्णा लाड, निलेश बलकावडे, सुमित काते, ग्रामविकास अधिकारी आदींसह आंगणवाडी व आशा सेविका, मदतनीस तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम युवक राष्ट्रवादीचे नागोठणे विभाग अध्यक्ष निवास पवार यांच्या वतीने व ऐनघर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.