सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली 🔷🔶🔷🔶

श्रीलंकेच्या पूर्वेकडील सागरी सीमेवर इंडियन ऑइलचा तेलानं भरलेल्या जहाजावर भीषण आग लागली आहे. तिथे एका तेलाचा टँकर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

समुद्राच्या मध्ये श्रीलंकेच्या सागरी सीमेजवळ ही दुर्घटना घडली. अनेक तासांपासून ही आग जहाजावर धुमसत होती. आगीमुळे आकाळात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट समोर आले आहेत.

श्रीलंकेच्या सागरी सीमेवर नौदल आणि हवाई दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.या फोटोंमधून आगीची भीषणता किती असेल याचा अंदाज येईल.

इंडियन ऑइल पारादीपमध्ये दररोज 3 लाख बॅरल क्षमतेची रिफायनरी चालवते. हे जहाज कुवैतच्या मिन्ना अल अहमदी बंदरातून निघाले आणि ते भारतात येणार होते. पण वाटेत श्रीलंकेजवळ आग लागली. या आगीत जहाजावरी क्रू मेंबरर्स जखमी झाल्याची माहिती मिळली आहे.







Be First to Comment