सिटी बेल लाइव्ह / आंध्रप्रदेश 🔷🔶🔷🔶
डेटा सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने चीनच्या पबजीसह 118 मोबाइल अॅप्सवर बंदी आणली. त्यानंतर देशातील एका राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने गुरुवारी चुकीच्या मार्गावर ढकलणाऱ्या रमी पोकर सारख्या ऑनलाइन गेम वर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सूचना मंत्री पी. वेंकटरमैया (नानी) यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑनलाइन सट्ट्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेवटी माध्यमांसोबत बातचीत करताना मंत्री म्हणाले की, ऑनलाइन सट्ट्याच्या सवयीमुळे तरुणांचं लक्ष भटकवून त्यांना नुकसान पोहोचवत आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी आम्ही तरुणांना वाचविण्यासाठी अशा सर्व ऑनलाइन सट्ट्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ऑनलाइन सट्ट्याच्या आयोजकांना पहिल्यांदा अपराधी आढळल्यास 1 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ते पुढे म्हणाले की दुसऱ्यांना दंडासाह 2 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तर ऑनलाइन गेम खेळत असताना सापडल्यास 6 महिन्यांपर्यंत शिक्षा होईल.
एक दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पबजी गेमवर आणली बंदी
आंध्रप्रदेश सरकारने हा निर्णय अशा वेळात आला आहे की जेव्हा एक दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पबजी सह 118 चिनी मोबाइल अॅप्सवर निर्बंध लावले आहेत. ऑनलाइन खेळणाऱ्या गेम्समघ्ये तरुणांमध्ये पबजी, पोकर आणि रमी प्रसिद्ध आहे.






Be First to Comment