Press "Enter" to skip to content

नागोठण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला खा. सुनिल तटकरे यांचा वाढदिवस साजरा

राबविले सामाजिक उपक्रम : आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती ###

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ###

रायगड रत्नागिरिचे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त नागोठणे विभाग युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हँड सँनिटायजर, मास्क, फेस शिल्ड, हँड ग्लोज
व इतर उपयोगी वस्तुंचे वाटप आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गवळ आळी स्मशानभूमी रस्तालगत आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली व आपले लाडके नेते खा. सुनिल तटकरे यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.

दरम्यान यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, त्यांचे सहकारी व कर्मचारी यांचे फार चांगल्या प्रकारे काम चालू असून हीच टीम आम्हा नागोठणेकर नागरिकांना पाहिजे अशी मागणी आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, माजी प. स सदस्य डॉ. राजेंद्र धात्रक, हरीशशेठ काळे, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, बाळासाहेब टके, कृष्णा धामणे, सुनिल लाड, युवक जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, उपसरपंच सखाराम घासे, मधुकर महाडिक, दिलीप अवाद, युवक शहर अध्यक्ष दिनेश घाग, दिपेंद्र अवाद, नामदेव लाड, मधुकर चौलकर, सचिन कळसकर, ग्रा. स. अकलाख पानसरे, अतुल काळे, प्रमोद जांबेकर, बिपीन सोष्टे, भारत भोय, अमित जांबेकर, मनोज टके, धृव सोष्टे, डॉ. सनी धात्रक, चेतन टके, पप्पू जैन, नरेश जैन, काझीम पानसरे, खालिद बागवान, नितीन पत्की, भूषण शिद, आदींसह प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, आरोग्य सहाय्यक यशवंत करजेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.