पनवेल तालुक्यात आज सापडले तब्बल 226 कोरोना रुग्ण : दोघांचा मृत्यू ###
सिटी बेल लाइव्ह / पनवेल ###
पनवेल तालुक्यात कोरोना चा कहर काही थांबता थांबत नाही दिवसेंदिवस कोरणा रुग्णांचा आकडा नवीन रेकॉर्ड स्थापन करत आहे पनवेल मध्ये करण्यात आलेले कडक लाॅकडाऊन ची माञा देखील लागू पडलेली दिसत नाही.
पनवेल तालुक्यात आज तब्बल 226 कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 181 तर ग्रामीण भागात 45 रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे आजही महानगरपालिका क्षेत्रात दोघांनी आपला जीव गमावला आहे.
पनवेलच्या ग्रामीण भागात सध्या 393 तर महानगरपालिका क्षेत्रात 1316 विद्यमान रुग्ण आहेत.आज महानगरपालिका क्षेत्रातील 97 तर ग्रामीण भागातील 28 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले असले तरी नवे रुग्ण कोरोना बाधित होण्याचे प्रमाण देखील दुप्पट झाले आहे ही खरी चिंतेची बाब आहे. जास्तीत जास्त रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन घरी परतण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील इतर चांगली सेवा देणाऱ्या रुग्णालयांना ट्रीटमेंट करण्याची परवानगी द्यायला हवी. महानगरपालिकेने आज ज्या रुग्णालयांना परवानगी दिली आहे ते फारसे कोणाचे परिचित नाहीत आज अनेक नागरिकांचे स्वतःचे आरोग्य विमा संरक्षण असते त्यामुळे जर चांगल्या रुग्णालयांना परवानगी दिली तर ज्यांच्याकडे आरोग्य विमा आहे असे पेशंट तेथे जाऊन उपचार घेऊ शकतील जेणेकरून ज्यांच्याकडे आरोग्य विमा नाही ते दुसऱ्या रुग्णालयात जाऊन कमी पैशात ट्रीटमेंट देऊ शकतात. आज जे रुग्णालय आरोग्य विमा कंपन्यांच्या लिस्टवर आहेत त्यांना उपचार करण्याची ची परवानगी नसल्यामुळे खरंतर आरोग्य विमा कंपनीच्या पैशांची बचत होत आहे.
Be First to Comment