Press "Enter" to skip to content

मनसेचा दणका रुपेश पाटिल यांनी दिला थकलेला पगार मिळवून

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) ###

पेण मध्ये असलेल्या जेएसडब्ल्यु कंपनीत एन.आर. कंस्ट्रक्शन या कॉन्ट्रॅक्टर कडे काम करणाऱ्या पेण येथील वशिष्ठ धावजी पाटील या युवकाचे कंपनीने तीन महिन्यांचे (जानेवारी ते मार्च )पगार ५१,००० थकवले होते. आर्थिक संकटाच्या काळात हातात पैसा नसल्याने या युवकाने मनसेचे रुपेश पाटील यांची भेट घेतली आणि आपली कहाणी सांगितली असता तात्काळ
मनसेचे रुपेश पाटील*यांनी थेट कंपनी गाठत कंपनी काॅन्ट्रक्टरला मनसेचा दणका दिला. त्यानंतर लगेच या युवकाला 15 दिवसात त्याचे पगार देण्याचे आश्वासन देऊन तसेच त्या युवकाला लाॅकडाऊन काळात 6 महिने दुसरा कोणताही काम धंदा नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले त्याबद्दल त्याचा मालकाला त्या युवकाची माफी सुद्धा मागाला लावली. पगार देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर वशिष्ठ धावजी पाटील याने रुपेश पाटील यांचे आभार मानले या अगोदरही रुपेश पाटील यांनी अशाच प्रकारे कंपनीमध्ये काम करणाऱ्या पेण शहरातील प्रथमेश म्हात्रे या युवकाला पण दोन महिन्याचा पगार मिळवून दिला होता त्यांच्या हा कार्याबद्दल अनेक युवक प्रेरीत झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.