Press "Enter" to skip to content

उरणमध्ये १८ पॉजेटीव्ह : २० जण घरी तर १ मयत


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

उरणमध्ये कोरोना पॉजेटीव्ह १८ जण सापडले तर २० जणांना घरी व १ जण मयत झाला आहे.
उरण ४, चिरले गावठाण १, भेंडखळ १, जसखार १, जेएनपीटी ३, करंजा १, केगाव १, मोरा ३, पागोटे १, विंधणे १, चिरनेर १ असे एकूण १८ जण पॉजेटीव्ह सापडले आहेत. तर उरण ३, चिरले १, करंजा १, रांजणपाडा २, बोकडविरा १, दिघोडे २, नवीन शेवा १, गोवठणे १, धुतूम ३, नवघर १, सावरखार १ असे एकूण २० जणांना घरी सोडण्यात आले. तर जासई येथील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती ठसा6 भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
एकूण पॉजेटीव्ह ४३८, बरे झालेले २७४, उपचार घेणारे १५४ तर मयत १० झालेले आहेत. उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १३ जुलैपासून ४ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. मात्र सदर लॉकडाऊन कशाप्रकारे असणार आहे याची माहिती जनतेत संभ्रम निर्माण करीत आहे. तरी प्रशासनाने उरण शहर व तालुक्यातील गावे व या परिसराती कंपनी बंद केल्यातरच खऱ्या अर्थाने लॉकडाऊन यशस्वी होईल. अन्यथा कामानिमित्त बहुतेकजण बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने उरण शहर, तालुका व कंपनीचे कामकाजही पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.