Press "Enter" to skip to content

काँग्रेस मध्ये सुद्धा संविधानाचे पालन व्हावे एवढीच अपेक्षा

काँग्रेस मध्ये सुद्धा संविधानाचे पालन व्हावे एवढीच अपेक्षा – कपिल सिब्बल 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाईव्ह/ नवी दिल्ली.🌟💠🌟💠

देशावर जास्त काळ सत्तेत राहणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. परंतु २०१४ पासून काँग्रेसची सत्ता गेल्यापासून पक्षाला घरघर लागल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत वाद सातत्याने बाहेर येत आहेत. पक्षाचे प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी थेट पक्षाच्या कार्यकारणीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान ते अजून ही नाराज असल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे.

मागिल आठवठ्यात काँग्रेस वर्कींग कमीटीच्या (CWC) बैठकीत कपिल सिब्बल यांच्यासह अन्य जेष्ठ नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून पक्षाच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेस वर्कींग कमीटीत आम्ही लिहलेल्या पत्राबाबत विचार केला जायला पाहिजे होता. या पत्रात आम्ही कोणतेही मुद्दे चुकीचे मांडले असतील तर आमची जरूर चौकशी व्हावी. परंतु, या पत्राची चर्चाच झाली नाही हे खेदजनक आहे. उलट या बैठकीदरम्यान देशद्रोही म्हणून मला हिणवण्यात आले. या बैठकीतील एकानेही याबाबत एक शब्दही काढला नाही, अशी नाराजी सिब्बल यांनी खंत व्यक्त केली.

दरम्यान आम्ही लिहलेल्या पत्रातील एकएक वाक्य पक्षाच्या हितासाठी होते. तसेच पत्रातील भाषा ही अतीशय सभ्य असल्याचे सिब्बल यांनी सांगीतले.

सिब्बल म्हणाले, माझ्यासह ज्यांनी पक्षाच्या कार्यकारणीवर प्रश्न उपस्थित केला त्यांचा पक्ष वाढीचाच उद्देश होता. परंतु, पक्षातील एकानेही आमच्या पत्राची दखल घेतली नाही. भाजपकडून संविधनाचे पालन होत नसल्याचे नेहमी काँग्रेस पक्षाकडून आरोप होतोय. परंतु, आमच्या पक्षाकडून ही संविधानाचे पालन झाले पाहिजे हीच आमची इच्छा असल्याचे सिब्बल यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.