Press "Enter" to skip to content

रोहे तालुक्यात कोरोनाचा वाढता क्रम : आज सापडले २० नवे रुग्ण


सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) ###


रोहे तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना आजाराचा धोका वाढत चालला असून, आज नव्याने २० रुग्ण आढळल्याने तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
औद्योगिक वसाहत असलेल्या रोहा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आज तालुका प्रशासन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार कोरोनाचे २० नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २३४ वर पोहोचली आहे. यापैकी १४६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ८६ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु आहेत.तर कोरोना मुळे आतापर्यंत मयत झालेल्या रूग्णांची संख्या २ आहे.दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या या बिमारीने सारेच हतबल झाले आहेत. त्यातच रोजच्या आकडेवारीत भर पडत असल्याने रोहेकरांचे टेन्शही वाढत चालले आहे.
तरी या महामारीत आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करून या आजारापासून लांबच कसे राहता येईल याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आहवान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.