शिक्षकांनी स्वकमाई मधून विद्यार्थ्यांना घेऊन दिले फोन
मदुराई मधील सरकारी शाळेतील घटना
सिटी बेल लाईव्ह/ चेन्नई
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. पण गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना या अडचणीचा सामना करावा लागला आहे.
काही विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, इंटरनेट सेवा, तर काहींना नेटवर्कसारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून तमिळनाडूमधील मदुराई येथिल शिक्षकांनी एक शक्कल लढवली आहे.
विद्यार्थ्यांची शिक्षणाची गाडी थांबू नये म्हणून तामिळनाडूतील मदुराई येथील शिक्षकांनी आपल्याच पगारतून विद्यार्थ्यांसाठी मोबाइल विकत घेऊन दिले आहेत.देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक राज्यांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
गरीब विद्यार्थ्यांसमोर यासाठी लागणारा मोबाइल आणि इंटरनेटची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न उभा राहतो, गरीब कुटुंबाला तर यातील काहीच परवडत नाही. मदुराई येथील सरकारी शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
या चांगुलपणाचा प्रत्यय आणखीन कुठे कुठे पाहायला मिळणार हा देखील औत्सुक्याचा विषय आहे.






Be First to Comment