सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 🔷🔶🔷🔶
अंतिम वर्षाच्या परीक्षा तर होणारच 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाईव्ह/ नवी दिल्ली 💠🌟💠🌟
अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या याचिकेचादेखील समावेश होता.
कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. न्यायमूर्ती अशोक बूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला.






Be First to Comment