डाक जीवन विमा, ग्रामीण जीवन विमा धारकांना डाक विभागाने दिली सुवर्ण संधी ! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / मिलिंद पाटील / सारळ – प्रतिनिधी 💠🌟💠🌟
केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या बाबत सर्वसामान्य विमाधाराकासाठी पूर्वी काढलेली विमा पॉलीसी जी बंद अवस्थेत आहे ती पुन्हा चालू करण्याची अजून एक संधी व त्या संबधीत सूचनाचे एक परिपत्रक डाक विभागाने प्रसिदध केले आहे.
त्यामध्ये असे अंतर्भूत केले आहे की, पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स नियम २०११ च्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने २५-१ / २०११ एलआय (पॅरा -२) दिनांक १ सप्टेंबर २०१९ टपाल जीवन विमा पॉलिसीधारक (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमाधारक (आरपीएलआय) यांना, ज्यांनी प्रथम हाप्त्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या अखंड कालावधीसाठी ती पॉलीसी भरली नसेल / व ती बंद झाली असेल. तर त्या पॉलिसीधारकांना याद्वारे असे कळविले जात आहे की, १.१२.२०२० नंतर न भरलेल्या या पॉलिसीच्या बाबत यापुढे ती पॉलिसी पुनरुज्जीवन करण्यास पात्र होणार नाही.
तरीही एक वेळ उपाय म्हणून, अंतिम पॉलिसी भरण्याच्या तारखेपासून 5 वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या जुन्या पॉलिसींना दिनांक ३०.११.२०२० पर्यंतच पुनरुज्जीवनासाठी सुविधा पुरविली जात आहेत. फक्त त्यासाठी त्या पॉलीसी धारकाचे आरोग्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या बाबतचा लाभ घेण्यासाठी अशा पॉलिसीचे धारक कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये लेखी अर्ज करू शकतात.
त्यानंतर दिलेल्या तारखेला म्हणजेच १.१२.२०२० नंतर त्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकणार नाही. अशाप्रकारच्या पॉलिसीज नियमानुसार कॅन्सल केल्याप्रमाणे मानल्या जातील याची कृपया नोंद घ्यावी. या पुढे ५ वर्ष व त्या पेक्षा जास्त बंद असलेल्या डाक जीवन विमा व ग्रामीण जीवन विमा पॉलीसी ३०.११.२०२० नंतर पुन्हा चालू करता येणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी दिलेल्या संधीचा फायदा घ्यावा. असे अहवान करताना, ही माहिती डाक अधीक्षक रायगड विभाग श्री उमेश जनवाडे यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.






Be First to Comment