Press "Enter" to skip to content

जेष्ठ शिक्षिका सुप्रिया क्षीरसागर यांचा विशेष सन्मान


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे,(नंदकुमार मरवडे) ###


रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर)विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सुप्रिया क्षीरसागर यांचा रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला आहे. आचार्य देवो भव अशी शिकवण देणारी आपली संस्कृती आणि एकलव्य -द्रोणाचार्य,शिव-समर्थ अशी गुरु शिष्याची परंपरा जपत रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब रोहा सेंट्रल नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर दिवेकर,माजी अध्यक्ष गणेश सरदार,राकेशजी कागडा, सचिव सुचित पाटील, रोटरी निखिल दाते, प्रदिप मेहता, मनिष जैन,अजित तेलंगे, सोहित कांकरिया या मान्यवरांच्या शुभहस्ते सुप्रिया क्षीरसागर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल,श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
समाजातच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोठे असल्याने राष्ट्र निर्मितीच्या कामात तसेच देशाची भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असल्याने त्यांच्याप्रती क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त करण्यासाठी आजच्या या दिनाचे औचित्य साधून शहरातील सेवानिव्रुत्त तसेच जेष्ठ शिक्षकांचा सन्मान
रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.