पहा हा व्हिडिओ
सिटी बेल लाइव्ह / सिंधुदुर्ग #
कोरोनाचे संकट ओढवले आणि सर्वत्र लॉकडाऊन झाले. या लाॅकडाऊन मध्ये अनेक नोकरदार सुट्टी भेटल्यामुळे आपल्या घरात बंदिस्त झाले. मात्र मूळचे कोकणातील असलेल्या काही चाकरमान्यांनी थेट आपले गाव गाठले. गावाकडे सध्या शेतीच्या कामांना जोर धरू लागला आहे. याचाच फायदा घेत अनेक चाकरमानी सध्या शेतीच्या कामांची मजा घेत आहेत. कधीही शेतीच्या बांधावरुन खाली न उतरलेले हे चाकरमानी आता थेट चिखल तुडवत भात लावणी करण्याची अनोखी मजा आणि आत्मिक समाधान मिळविताना दिसत आहेत. कोकणातील स्थानिक गावकरीही मुंबईच्या या पाहुण्यांची हौस पाहून आनंद व्यक्त करीत आहेत.
काही दिवसांपासून पावसाने दमदार सुरवात केल्याने बळीराजा सुखावला असून लावणीसह इतर कामांना त्याने जोरदारपणे सुरवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. कोकणात आजही पारंपारिक शेती केली जाते. सध्याच्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून त्यांनी लावणीला सुरवात केली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या पिकावर चांगला होण्याची शक्यता शेतकरीवर्गाकडून वर्तविण्यात येत आहे. सध्या शेती बांधावर लावणीची कामे करताना व्यस्त असलेले शेतकरी व त्याचे कुटूंबिय आणि हौशी मुंबईकर दिसत आहेत. हे मुंबईकर काम करण्यासोबत फोटोग्राफी करण्यात देखील मग्न झालेले दिसत आहेत.
Be First to Comment