हाडांच्या दुखण्यात वाढ वाहनाचे अतोनात नुकसान ! 🔷🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खारी-रोहे (केशव म्हस्के) 💠✳️💠✳️💠
रोहे-चणेरा पारंगखार मार्ग हा रोहा सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत येत असल्याने सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डेमय झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रवासी नागरिकांमध्ये हाडांच्या दुखण्यात वाढ होत असून वाहनाचे फार मोठे अतोनात नुकसान होत असल्याच्या रोजच विविध तक्रारी ऐकू येत आहेत. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी या मार्गावर दैनंदिन कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणे आवश्यक आहे. परंतू संबंधित खात्याकडून या मार्गाचे पक्के डांबरीकरण न करता उन्हाळ्यात फक्त खड्डे बुजवून खडी – गिरिट ,माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात मलमपटृटी केली जात असून ठेकेदारांचे खिसे भरले जात आहेत.त्यामुळे पहिल्याच पावसात हा सतत अवजड वाहनांची वर्दळ असलेला मार्ग उखडला गेला.
या वर्षीच्या पावसाळी हंगामात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही.त्यामुळे हा मार्ग जेमतेम तग धरून होता.परंतू जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून प्रवासी नागरिकांमध्ये हाडांच्या दुखण्यात वाढ होत असून,वाहनाचे अतोनात फार मोठे नुकसान होत असल्याच्या विविध तक्रारी दररोज ऐकू येत आहेत. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मोठी समस्या निर्माण झाली असल्याने जीव मुठीत घेऊन करावा लागतो. प्रवास प्रत्येक क्षणी सा.बा.खात्या च्या अधिकारी वर्गासह लोकप्रतिनिधींना अशुभ बोलत शिव्यांच्या लाखोळ्या वाहत असतात.
या मार्गावर रोहा तालुक्याचे मुख्यालय समजले जाणारे प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन तसेच शहराकडे आणि धाटाव औद्योगिक वसाहत असल्याने विक्रम इस्पात,मुरुड ,अलिबाग कडे जाणाऱ्या अवजड वाहनांची सर्रास ये – जा चालू च असते.याशिवाय प्रवासी तसेच खाजगी वाहनेही मोठ्या संख्येने धावत असतात.१६ किमी लांबीच्या या मार्गावरील काही ठिकाणचा भाग सोडला तर जवळजवळ सर्वच मार्ग हा खड्डेमय झाल्याने रात्री अपरात्री लहान मोठे अपघात झालेल्या नोंदी असताना देखील रोहा सार्वजनिक बांधकाम खाते खड्डे बुजविण्यात रममाण झाल्याने तात्पुरती मलमपट्टी मध्ये ठेकेदाराकडून दरवर्षी भरपूर मलिदा मिळत असल्याने त्यांचे आर्थिक बजेट सांभाळणे गरजेचे दिसत असून त्यामध्येच समाधान मानत आहेत. परिणामी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गत वर्षी लोकसभा,विधानसभा आदी सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्याने आचार संहिता लागू झाल्याने काम करणे शक्य नाही निवडणुका संपून नवनिर्वाचित विद्यमान खासदार, आमदार, सभापती,सरपंच यांना गंभीर समस्येकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. किंबहुना त्यांना वेळच नाही. आता पावसाळ्यात या मार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागल्याने ये रे माझ्या मागल्या निदान या वर्षी तरी उन्हाळ्या पूर्वी पक्के डांबरीकरण होईल असे वाहनचालक व प्रवासीवर्गाला वाटले होते.परंतू पक्क्या डांबरीकरणाचे पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे.
या मार्गाची भयानक अवस्था पाहता पुढील दिवसात या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठे जिकिरीचे व आव्हानात्मक होणार असल्याने त्याचा नाहक मनस्ताप आम्हां दैनंदिन प्रवासीवर्ग व वाहनचालक यांना सोसावा लागत आहे. हे विघ्हर्त्या गणपती बाप्पा लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी,रोहा सार्वजनिक बांधकाम खाते यांना जाग देऊ रे,चांगली बुध्दी दे रोहे-चणेरा – पारंगखार मार्गा वरचे खड्ड्यांचे विघ्न दूर होऊन चांगले मजबूत पक्के रस्ते होऊ दे !
🔷 एक त्रस्त प्रवासी 🔶






Be First to Comment