सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶🔷
लाॅकङाऊनचे नियम सैल झाले असले तरि टाईट होण्यासाठी अट्टल मद्यपी कोणत्या थराला जात असून फूलविक्रेत्याचा जवळपास पंधरा हजाराचा माल दारूङ्यानी चोरून नेल्याची घटना खालापूरात घङली आहे.
गणेशोत्सवात फूलांचे दर कङाङले आहेत.हार ,कंठी याचे दर वाढले असले तरि ग्राहक खरेदि करत आहेत.खालापूर शहरातील फूल विक्रेत्यानी ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराचे हार,दुर्वांची कंठी तयार करून माल ओसरीत ठेवला होता.रविवारी पहाटे मद्यपीची नजर तयार करून ठेवलेल्या मालावर गेली.त्याने सध्या फूलाचे मोल ओळखून हाराचं बोचक चोरून नेलं.
सकाळी हार नेण्यासाठी गि-हाईकांची रांग लागल्यानंतर ओसरीत माल नसल्याचे फूलविक्रेत्याच्या लक्षात आले.मद्यपी खोपोली गावात हार विक्रीला बसल्याचे समजल्यावर फूलविक्रेत्यानी खोपोली गाठली. मद्यपीला पोलीस ठाण्यात न्यायला लागल्यावर हातापाया जोङत माफी मागितल्यामुळे सोङण्यात आले.हार असलेल बोचक जङ असल्याने उचलता न आल्याने खेचत नेल्यामुळे माल खराब होवून फूलविक्रेत्याचे आर्थिक नुकसान झाल आहे.






Be First to Comment