गेली 21 वर्षे फळांच्या हजारों बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात रूजवण्याचा घेतला वसा 🔷🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 💠✳️💠✳️💠
आपल्या देशात व राज्यात वाढत्या औद्योगिकारणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ही ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे गेली 21 वर्षे फळांच्या हजारों बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत.

त्यातील शेकडोंच्या संख्येने झाडे जगून याचा फायदा तुम्हा आम्हाला व पक्षी, प्राण्यांना तसेच आहे. त्यांच्या या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.
थेंब थेंब पाणी साचून तळे बनते एक एक झाडांपासून जंगल बनत म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. पेरू तरच उगवेल या उक्ती प्रमाणे मे महिना म्हणजे फणस, आंबे, काजू, चिंच, करवंदे, जाम, जांभळे, रांजणे अशा अनेक फळे खायची चंगळ असते. परंतु आपण या फळांचा आस्वाद घेऊन त्यांच्या बिया फेकून देतो. मात्र तसे न करता खाल्लेल्या फळांच्या बिया एक भांड्यात जमा करा.

उदाहरणार्थ, तुम्ही आमरस केला त्या आंब्याचे बाठे, जांभळाचा रस काढलात त्या जांभळाच्या बिया, चींच जेव्हा कटिंग करतो त्याचे निघालेले चिंचोके, काजू, फणस खाल्ल्यानंतर त्याच्या निघालेल्या बिया अशा अनेक फळांच्या बिया कृपया फेकून देऊ नका. त्या जमा करा त्यांना चांगल्या उन्हात सुकवा. नंतर एका पिशवीत किंवा गोणीत भरून ठेवा व त्या सर्व सुकलेल्या बिया पावसाळा सुरू होण्याअगोदर कुठल्या तरी किल्ल्याच्या सभोवती किंवा रानात, जंगलात किंवा कुठल्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूस थोड्या थोड्या टाकत जा.

जर आपण एक हजार बिया या वर्षी पेरल्यात तर त्या बियांपैकी दहा जरी झाडे तरी नक्कीच उगवतील. यामुळे तुमच्या कष्टाचे सार्थक झाले असे समजा. आपण सर्व या धरती मातेचे व सृष्टीचे देणेदार आहोत. अशा प्रकारचा उपक्रम उरण केंगाव येथील सिडको कर्मचारी असलेले हितेंद्र सदाशिव घरत. गेली 21 वर्ष न चुकता स्वतः पंचवीस ते तीस हजार बिया दरवर्षी कुठल्या ना कुठल्या जंगलात पेरत आहेत. जर आपल्यापैकी कोणाला जमत नसेल तर त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया गोळा करून ठेवून त्यांना फोन केल्यास त्या घेऊन जाईन असे आवाहन त्यांनी मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक व जनतेला केले आहे.

यामागे वाढत्या औद्योगिकारणामुळे झाडांची कत्तल होऊन निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याने त्याच्या दुष्परिणामाचा सामना आपल्या करावा लागत आहे. यामुळे निसर्गाची जपवणूक करण्यासाठीच झाडांच्या बिया पेरण्याचे काम गेली 21 वर्षे करीत आहे, यापुढेही करीत रहाणार आहे. यातील हजारो झाडे जगातील व त्यांच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येईल व निसर्गाची जपवणूक केल्याचा आगळा वेगळा आनंद मिळत असल्याचे निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी सांगितले.
हे सामाजिक कार्य करण्यासाठी हितेंद्र घरत यांना उदंड आयुष्य लाभो. याच सिटी बेल लाइव्ह तर्फे शुभेच्छा!






Be First to Comment