खोपटे गावातील निवृत्त शिक्षकाच्या घरी ईको फ्रेंडली बाप्पा!! 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (अजीत पाटील ) ✳️💠✳️💠
खऱ्या अर्थाने ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस बाळगून तो प्रत्यक्षात उतरविण्याची किमया उरणच्या खोपटे पाटीलपाडा गावातील निवृत्त शिक्षकाने साधली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने निवृत्त शिक्षक श्री. रा. र. पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात हुबेहूब नौकेची प्रतिकृती तयार केली असून त्याकरिता घराच्या बांधकामाच्या निमित्ताने राहिलेल्या टाकाऊ वस्तूंचे वापर करण्यात आले आहे.
यामध्ये पी यु पी च्या राहिलेल्या पट्ट्या , बेटाच्या काठ्या , स्लॅबसाठी वापरात येणारे मुंढे आदींची राहिलेली टाकाऊ लाकडे आदींचा वापर करण्यात आला आहे. या सर्व वस्तू मोठ्या खुबीने वापरून त्याद्वारे जुन्या काळातील नौकेची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बोकडवीरा गावातील हेमंत(हेमाचूड ) आत्माराम पाटील यांच्या सल्ल्याने विनीत पाटील व भौमिक पाटील या युवकांनी ही नौका साकारली असून उरण पुर्व भागातील पंचक्रोशीत गणपती बाप्पा साठी तयार करण्यात आलेला हा मखर चर्चेचा ठरला आहे.
सध्याच्या कोरोना महामारीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हात स्वछ धुण्यासाठीच्या व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टंन्सीगचे उल्लघंन होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. पाटील गुरुजी यांच्या घरी गौराईचे देखील आगमन होणार असल्याने मखरानिमित्त तयार करण्यात आलेल्या नौकेवर गौराईसाठी ही सध्या जागा ठेवून देण्यात आली आहे. ही प्रतिकृती विविध सोशल मीडियावर टाकली असता ती भलतीच हिट ठरत असल्याचे दिसून येत आहे.







Be First to Comment