Press "Enter" to skip to content

रोह्यात घरोघरी गणरायाचे उल्हासात आगमन

श्री.गणेशाच्या आगमनाबरोबरच कोरोनाच्या भयाची तीव्रता झाली कमी 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 💠✳️💠✳️


दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना महामारीवर मात करीत रोह्यात शहरासह ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या उल्हासात गणरायाचे आगमन करण्यात आले आहे.तर श्री.गणेशाच्या आगमनाबरोबरच कोरोनाच्या भयाची तीव्रताही कमी झाली असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे.

वर्षभरात संपन्न होणाऱ्या विविध सण समारंभात गणेशोत्सवाला आपल्या महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभर व जगभरात आगळे वेगळे महत्त्व आहे. भाद्रपद शु.चतुर्थीला दरवर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा अर्चा केली जाते.भक्तांच्या हाकेला धावणारा व दु:खाचे निवारण करणारी देवता म्हणून श्री.गणेशाचे एक आगळे वेगळे स्थान असल्याने विसर्जन होईपर्यंत श्री.गणेशाबाबत श्रद्धा दर्शवित पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो.

सध्या सा-या जगभर कोरोना महामारीने अक्षरशः थैमान घातले असून सारे सण समारंभ साजरे करताना शासकीय नियम व सामाजिक सुरक्षिततेचे भान ठेऊन साजरे केले जात आहेत. नुकतेच श्री.क्रुष्ण जयंती व १५ आँगस्ट हे राष्ट्रीय सणही याच पद्धतीने साजरे करण्यात आले. तर गणेशोत्सवास सुरुवात होण्यापूर्वी कोरोना व्हाईरसच्या भितीमुळे प्रत्येकाच्या मनात म्हणावा तसा उत्साह दिसून येत नव्हता.परंतू घरोघरी श्री.गणेशाचे आगमन होताच सा-या भक्तांच्या मनातील मरगळ दूर होऊन कोरोना महामारीची तमा न बाळगता प्रत्येकजण हा आपला आवडता उत्सव आपापल्या परीने साजरा करण्यात रममाण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.