37 रुग्णांनी केली मात : 153 रुग्णांवर उपचार सुरू 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / महाड : रघुनाथ भागवत 💠✳️💠✳️
एकीकडे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले असताना दुसरीकडे महामारी कोरोनाचे संकट मात्र कमी होण्याचे काहीही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे महाड तालुक्यातील जनतेमध्ये कोरोनाची दहशत असून विघ्नहर्ता गणपती बाप्पाकडे कोरोनाचे संकट कायमचे निघून जावे असे गणेश भक्तांकडून साकडे घातले जात आहे,
दरम्यान आज 22 ऑगस्ट रोजी महाड तालुक्यात नव्या 26 रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असून 37 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर दुर्दैवाने 3 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
महाड तहसीलदार कार्यालयातुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज शनिवार 22 ऑगस्ट रोजी 26 कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये टोल बु. येथील 63 वर्षीय पुरुष, ढाळकाठी-बिरवाडी येथील 48 वर्षीय महिला, बिरवाडी येथील 40 वर्षीय महिला, नांगलवाडी पोस्ट इसाने कांबळे येथील 55 वर्षीय पुरुष, साई पॅलेस महाड येथील 34 वर्षीय पुरुष, विन्हेरे येथील 42 वर्षीय पुरुष, आदर्श नगर बिरवाडी येथिल 40 वर्षीय महिला, सूर्या सोसायटी तांबटभुवन महाड येथील 28 वर्षीय पुरुष, ढाळकाठी-बिरवाडी येथील 17 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला, शुभलाभ कॉम्प्लेक्स एमआयडीसी येथील 30 वर्षीय पुरुष, नाते येथील 32 वर्षीय पुरुष, महाड येथील 54 वर्षीय पुरुष, बिरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, आदर्श नगर बिरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, ओअन कंपनी नांगलवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, साई स्नेह कॉम्प्लेक्स महाड येथील 56 वर्षीय पुरुष, उगवतीवाडी वहूर येथील 43 वर्षीय पुरुष, कवेआळी महाड येथील 45 वर्षीय पुरुष, मातृस्मृती बिल्डिंग महाड येथील 60 वर्षीय पुरुष, ओलान हौसिंग कम्पनी एमआयडीसी महाड येथील 77 वर्षीय पुरुष, शुभलाभ बिल्डिंग संतोष नगर नांगलवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, चैतन्य आर्केड प्रभात कॉलोनी महाड येथील 54 वर्षीय पुरुष, राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, पारवाडी येथील 22 वर्षीय पुरुष तर देशमुख मोहल्ला महाड येथील 30 वर्षीय पुरुष इत्यादी आढळले आहेत.
कोरोनाच्या महामारीतून आज 37 जणांनी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने आदर्श नगर बिरवाडी येथील 40 वर्षीय महिला, ओअन कंपनी नांगलवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, साई स्नेह कॉम्प्लेक्स महाड येथील 56 वर्षीय पुरुष या 3 जणांनी कोरोना महामारीत आपले प्राण गमावले आहेत. महाड तालुक्यात आज पर्यंत 835 कोरोना बाधित रुग्ण सापडले तर 644 रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली.
दुर्दैवाने तालुक्यातील आजपर्यंत 38 जणांनी प्राण गमावले, तर 153 कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.






Be First to Comment