कोरोनाचा कहर सुरूच, शुक्रवारी 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले :
एकूण बधितांची संख्या 124 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) ✳️💠✳️💠
सुधागड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतांना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये एका 10 दिवसांच्या बाळाचा देखील समावेश आहे. या बाळावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल 124 रुग्ण झाले आहेत. आत्तापर्यंत कोरोनाचे 76 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 45 रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रायन्नावार यांनी केले आहे.






Be First to Comment