कर्जत खालापुर मध्ये आढावा घेत समन्वयाने काम करण्याचा दिल्या सुचना
सिटी बेल लाइव्ह / कर्जत – (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
रायगड जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पहिल्यादांच कर्जत खालापुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागाचा दौरा करत जिल्ह्यातील ढेपाळलेली आरोग्य सेवा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दि. 21 आँगष्ट रोजी दिवसभर कर्जत खालापुर मध्ये विशेष दौरा करत आढावा घेतला गाव पातळीवर काम करणारे ग्रामसेवक, आशा वर्कर ,अगंणवाडी सेवीका व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणण्याच्या सूचना केल्या यावेळी केल्या.कर्जत मध्ये लॉकडाउन कालखंडात गरोदर महिला व मुलांच्या आरोग्याची हेळसांड झाल्याची बाब प्रसारमाध्यमातून पुढे आली होती या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी आधिकारीचा हा दौरा महत्वाचा होता. खालापुर तालुक्यातील हाळ येथील एक आदिवासी गरोदर महिलेला आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला होता तर कर्जत तालूक्यात मार्च महिण्यापासून गरोदर महिलांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळाली नव्हती ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सूधाकर घारे यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा आधिकारी यांनी पण नूकताच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी सुध्दा तालुक्यातील आरोग्य समस्यांची मांडणी केली होती. 21 तारखेच्या दौऱ्यावेळी खालापुर पंचायत समीती मध्ये सर्व अधिकाऱ्यांचा आढावा घेतला तर कर्जत मधील आदिवासी उपाय योजनेतील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र, पिगंळस उपकेंद्र तसेच कळंब प्राथमीक आरोग्य केंद्रात भेटी देत अधिकाऱ्यांचा आढावा घेतला, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी आधिकारी नितीन मंडलीक, कर्जत पंचायत समीतीचे गटविकास आधिकारी बि. एस. पुरी, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सि. के. मोरे, एकात्मीक बालविकास चे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, आरोग्य आधिकारी कर्मचारी, महिला बालविकासच्या विस्तार आधिकारी, पर्यवेक्षीका, आरोग्य पर्यवेक्षीका आदि आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.






Be First to Comment