सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
कोरोनामुळे देशात गेल्या काही महिने लॉकडाऊन आहे. कोणीही कामावर नाही. खिशात पैसा नाही. कधीही कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव लागेल या भीतीने लोकांची मानसिक अवस्था सैरभैर झाली आहे. अशातच सण आला तर लोकांना काही दिवस तरी या मानसिक अवस्थेवर मात करता येते. घरात आनंदी आनंद असतो…
पण… पण तुमच्या लुटमारीने या आनंदावर नेहमीच विरजन पडत. निदान यावर्षी तरी लोकांना समजुन घ्यायच होत. तुमचं ४ महिन्यांच नुकसान तुम्ही लोकांकडून ४ दिवसात वसुल करायच ठरवल आहे बहूतेक. केश कापायला गेलो… लुट… भाजी घ्यायला गेलो… लुट… रिक्षात बसलो… लुट… डॉक्टरकडे गेलो… लुट…. सगळीकडे सध्या फक्त लुट लुट आणि लुटच सुरू आहे… कोरोना तर लुटतोच आहे… वर तुम्हीही लोकांना लुटताय… अहो, गणपतीसाठी हार घ्यायला गेलो तरी २० रूपयांचा हार आज १०० रूपयांना मिळतोय.
व्यवसाय करा… आम्ही सोबत आहोतच… पण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटू नका… वाजवी दर लावा… तुमच नुकसान करू नका पण अवाजवी दरही लावु नका.नाहितर लोकं रस्त्यावर उतरतील.ती वेळ लोकांवर नका यायला देऊ असे आवाहन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवल यांनी केले आहे.






Be First to Comment