ग्रामस्थांनी मानले सिटी बेल लाइव्ह चे आभार ! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / गोवे -कोलाड (विश्वास निकम ) 💠✳️💠✳️
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्ष पूर्ण झाली मात्र ग्रामीण भाग हा अद्याप काही मूलभूत सोयी सुविधा तसेच काही विकास कामांपासून पासून वंचित राहिला स्वतंत्र काळात काही ग्रामीण भागातील रस्ते पूर्णतः खड्डेमय व विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या व विद्युत खांब हे अक्षरशः जीर्ण व सडलेल्या अवस्थेत होते सदरच्या ग्रामस्थांची दखल घेत सिटी बेल वर रायगड जिल्ह्यातील पालक मंत्र्यांच्या तालुक्यातीच ग्रामीण भाग हा स्वतंत्र काळात पारतंत्र्यात आहे असे वृत प्रसिद्ध करताच या गावात तातकाल या ठिकाणी नवीन विद्युत तारांसह खांब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सिटी बेल लाइव्हसह संबधित खात्याचे देखील आभार मानले. मात्र खांब देवकान्हे मार्गावरीर खड्डे न भरल्याने विभागातील नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड. या मार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले आहे तसेच या मार्गालगत अनेक गावे देखील वसलेली आहेत मात्र ती काही सोयी सुविधांपासून वंचित राहिली रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील ग्रामस्थांनी गावातील अत्यन्त धोकादायक जीर्ण झालेले विद्युत खांब व विद्युत तारा बदलण्याची मागणी अनेकदा संबधीत खात्याकडे केली होती मात्र संबधित खात्याकडून याकडे कोणाडोळा केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आणि या गोष्टीचा पाठपुरावा वृत्तपत्राच्या माध्यमातून दिनांक १९ ऑगस्ट रोजी सिटी बेल मध्ये प्रसिद्ध करताच याची दखल घेत ऐन गणपती उत्सव काळात संबधित विद्युत महामंडळाच्या वतीने येथील जीर्ण अवस्थेत असलेले खांब व विद्युत तारा तात्काळ २० ऑगस्ट रोजी बसविण्यात आल्याने येथील ग्रामस्थांनी वृत्तपत्राचे व संबधित अधिकारी वर्गाचे आभार मानले.
मात्र खांब देवकान्हे पालदाड पुलावरील भयानक पडलेले खड्डे न भरल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.






Be First to Comment