घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
दिल्ली पोलिसांनी isis हस्तकाला ठार मारले
सिटी बेल लाईव्ह/ दिल्ली.
भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांना कंठस्नान घातलं आहे. पंजाबच्या तरन तारन येथील सीमाभागात जवानांनी ही कारवाई केली आहे. सध्या आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे .
बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांना पहाटे सीमाभागात काही संशयास्पद घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर जवानांनी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास गोळीबाळाला सुरुवात केली. या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले आहेत . जवानांना घुसखोरांकडून एक AK 47 आणि दोन पिस्तूल मिळाल्या आहेत.
देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह सुरू असताना दुसऱ्या बाजूला पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवरील घुसखोरीचा मोठा डाव हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांचा खात्मा केला आहे. शनिवार पहाटे ही मोठी कारवाई करण्यात आली.
आज सकाळी दिल्ली पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यानंतर पोलिसांनी ISIS च्या एका अतिरेक्याला अटक केली आहे. अतिरेक्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच देशावर येणारे विघ्न पोलीस आणि बीएसएफच्या जवानांनी रोखून धरले आहे.






Be First to Comment