सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणेशाचे आज दि.22 ऑगस्ट रोजी आगमन झाले आहे, हा सण दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र या वर्षी या सणाला कोरोना चे सावट आहे, त्यामुळे शासनाने हा सण साजरा करताना काही नियमाचे पालन करण्याच्या आदेश दिले आहेत त्यानुसार कर्जत नगर परिषदेमध्ये गणपती विसर्जनासाठी दहा कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
या तलावांची पाणी नुकती मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी केली व संबंधित कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या.
कर्जत नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना नगर परिषदेतर्फे आव्हान करण्यात येते की यावर्षीचे गणपती विसर्जन माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्रमांक 407 नुसार आणि करोना महामारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात कामी पारंपारिक पद्धतीने नदीत न करता नगरपरिषदेने विविध ठिकाणी नगरपरिषद क्षेत्रात दहा कृत्रिम तलाव तयार केले आहेत त्या परिसरातील नागरिकांनी त्याच ठिकाणी गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहनन कर्जत नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
गणपती विसर्जन हे घरगुती स्वरूपात पाण्याच्या पिंपात किंवा बादलीत करण्यात यावे, नगर परिषद कर्मचारी यांच्याकडे गणेश मूर्ती जमा करणे त्यांचे शास्त्रोक्त व धार्मिक पद्धतीने विसर्जन केले जाईल नगर परिषदेतर्फे कृत्रिम तलाव प्रायोगिक तत्त्वावर खालील ठिकाणी करण्यात आले आहे.
# दहिवली आकुर्ले परिसरासाठी जुने ग्रामपंचायत कार्यालय जवळील चौकात, श्री विठ्ठल मंदिर परिसरात,आकुर्ले बाम च्या मळा येथे.
# गुंडगे भिसेगाव परिसरासाठी गुंडगे येथील श्री सोमजाई मंदिर तर भिसेगाव येथील श्री आंबे भवानी मंदिराजवळ.
# कर्जत परिसरात टिळक चौक जुने नगर परिषद कार्यालय जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राकेश मसाला दरम्यान म्हाडा कॉलनी समोरील शिंदे यांच्या घराजवळ.
# मुद्रे परिसर नाना मास्तर नगर येथील श्री गणपती मंदिर जवळ मुद्रे गावठाण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगरपरिषदेच्यावतीने कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या तलावाची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली.यावेळी त्याच्या समवेत स्थापत्य अभियंता निलेश चौडीए, सुदाम म्हसे उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी डॉ पाटील यांनी काही सूचना दिल्या.
शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून नगरपरिषद प्रशासनास विसर्जन कामी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी जनतेस केले आहे.






Be First to Comment