सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) ###
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील तीव्र उतारावर कंटेनर चालकाचा कंटेनर वरचा ताबा सुटल्याने त्या कंटेनरने मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या टॅन्करला धडक दिली. या अपघातात टॅन्करचालक टॅन्करच्या कॅबीनमध्ये अडकला होता. त्या चालकाला वाहतूक पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले. त्याला कंळबणी येथील उपजिल्हा रूग्णालयात वैघकीय उपचारासाठी दाखल केले. हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. गंभीर जखमी असलेल्या चालकांचे नाव अरविंद गुप्ता (वय – ३०) असे आहे. मुंबई – गोवा महामार्गावरून कंटेनर ( क्र.एनएल – ०१- एडी – ७६४९) हा मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान, कशेडी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून हा कंटेनर समोरून येणाऱ्या टँकरवर आदळला. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची अद्यापही पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
Be First to Comment