सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांनी कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून साध्या पद्धतीने साजरा केला.
माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांनी नेहमी नागरिकांसमोरील समस्या सोडविण्यासाठी आपले आयुष्य व्यथित केले.त्यांना मिळालेल्या सात महिन्यांच्या सरपंचकालात त्यांनी विकासकांमांचा सपाटाच लावून कित्येक वर्षे प्रलंबित असलेली विकासकामे फक्त सात महिन्यांच्या सरपंचकालात करून दाखविली.परिसरातील तरुणवर्गांला त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा मिळत असते.कोरोनाचे संकट असल्याने त्यांनी वाढदिवसादिनी रिस हद्दीतील ४१५ नागरिकांना स्टिमर(वाफ घेण्याचे मशीन) घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यासाठी नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे या हेतूने माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांनी ४१५ स्टिमरचे वाटप केले.तसेच माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी अपघातात जखमी झालेल्या कु.नलावडे याला मोफत व्हिलचेअर देवून सहकार्य केले.

याचप्रमाणे सभापती वृशाली पाटील आणि माजी सभापती कांचन कृष्णा पारंगे यांच्या पंचायत समिती सेस फंडातून अनुसया सोसायटी ते बालाजी गार्डंन कडे जाणारा रस्ता,रिस बौध्दवाड्याकडे जाणारा रस्ता,मोहोपाडा आदीवासीवाडीकडे जाणारा रस्ता,मोहोपाडा शिंदीवाडीकडे जाणारा रस्ता याठिकाणी हायमास्ट दिवे लावल्याने गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला परीसर उजळून निघाला होता.या चारजागी लावलेल्या हायमास्ट दिव्यांचे उदघाटन सभापती वृशाली पाटील,माजी सभापती कांचन पारंगे,सरपंच ताईं पुंडलिक पवार व माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभापती वृशाली पाटील,माजी सभापती कांचन कृष्णा पारंगे, सरपंच ताई पवार,उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच भाग्यश्री पवार,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी जांभले,सदस्या श्र्वेता संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्याम म्हस्कर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील, ग्रंथपाल टि.बी.त्रिभुवन, रमेश कांबळे,लक्ष्मण जांभले,अशोक पारंगे, दिनकर पारंगे,राम पारंगे, अनिल कांबळे, आत्माराम जांभले,शंकर भोईर,गौरव पाटील,संजय कांबळे,पु़ंडलिक पवार,रतन गायकवाड,जयंत पारंगे,सुरज पाटील,नितिन पारंगे आदी उपस्थित होते.






Be First to Comment