Press "Enter" to skip to content

मनोज खेडकर यांच्या पाठपुराव्यामुळे मोबाईल नेटवर्किंग सेवा सुरळीत

सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे) 🔶🔷🔷🔶

माथेरान मध्ये सध्या मोबाईल टॉवर बंद असल्याने मोबाइल धारकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. याकामी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाशी सातत्याने मेलद्वारे संपर्क साधून ही बंद असलेली सेवा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर व्होडाफोन कंपनीच्या अधिकारी वर्गाने इथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सर्व असलेले तांत्रिक बिघाडाचे निराकरण केल्यामुळे व्होडाफोन मोबाईल नेटवर्किंग सेवा पूर्वपदावर आली आहे.

माथेरान पर्यटन बंद झाल्यानंतर येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत त्यामुळे येथील मोबाईल कंपन्यांनाही त्याचा फटका बसलेला आहे पण मागील काही दिवसांपासून श्रावणातील सण सुरु झाल्यानंतर येथे पुन्हा मोबाईल चा वापर वाढला होता पण येथील मोबाईल सेवा देणारे वोडाफोन बीएसएनएल चे ग्राहक एक आठवड्यापासून सेवा मिळत नसल्याने हैराण झाले आहेत.

फोन केल्यानंतर पैसे तर कट होतात पण बोलणे मात्र होत नसल्याने ग्राहकांच्या किशाला कात्री बसत आहे व वोडाफोन ग्राहक मंचाशी संपर्क केला असता दोन दिवसांमध्ये सेवा पूर्ववत केली जाईल असे सांगितले जाते पण एक आठवडा उलटून गेला तरीही जैसे थे हीच परिस्थिती आहे. तर बीएसएनएल चे नेटवर्क नेहमीच गायब होत असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका येथील एकमेव बँक असलेल्या युनियन बँकेला बसत आहे येथील ऑनलाईन व एटीएम सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना पासबुक वर एंट्री मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे .

गणपती जवळ येऊन ठेपल्याने नागरिकांमध्ये मोबाईल कंपन्यान विरुद्ध रोष वाढला असून लवकरच हि सेवा सुरळीत करावी अशी मागणी सर्वच थरातून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.