सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) 🔷🔶🔷🔶
रोहा येथील रोहा नगर परिषदेच्या सफाई कामगारांना स्व.बाबुलालजी चुनीलालजी सोलंकी यांच्या परिवाराच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे कार्य कौतुकास्पद आहे.यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक महेंद्र गुजर,हितेंद्र सोलंकी, मयूर पायगुडे,हेमंत जैन, नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र आयनोडकर आदींसह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.नगरसेवक महेंद्र गुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.






Be First to Comment