Press "Enter" to skip to content

धाटावचे माजी सरपंच यशवंत जाधव (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) 🔶🔷🔶

धाटाव गावचे सुपूत्र तत्कालीन धाटाव किल्ला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे विश्वासू सहकारी यशवंत जाधव यांचे गुरुवारी सायंकाल दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय८१ वर्ष होते. त्यांच्या निधनाने सबंध पंचक्रोशीतील वात्तावरन शोकाकुल झाले आहे.

यशवंत जाधव यांना आवडीने सर्वच आण्णा म्हणत.उत्तम राजकारणी तर एक गुणवंत ठेकेदार म्हणून त्यांचा लौकिक होता.सामाजिक का धार्मिकतेची आवड असलेले आण्णा सर्वाचेच आवडते होते. गावाचे गावपण एकत्र कसे राहील याकडे त्यांचा अधिक कल असे. माजी सभापती कै.द.ग.तटकरे,लोकनेते भाईसाहेब पाशिलकर,कै.भगवान बामुगडे यांच्या समवेत धाटाव विभागात जाधव यांनी राजकीय वलय निर्माण केले होते. भाईसाहेब पाशिलकर यांच्या राजकीय घडामोडीत यशवंत जाधव यांचा सक्रीय सहभाग नेहमीचाच असे.त्याचकाळात यशवंत जाधव यांनी धाटाव किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच, नंतर सरपंच असाही यशस्वी कारभार सांभाळला.
यशवंत जाधव यांच्या निधनाचे वृत्त कळताच तालुक्यातील विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, सरचिटणीस विजय मोरे,धाटाव ग्राम पंचायत सदस्य,सदस्या व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.तर खा. सुनिल तटकरे,लोकनेते भाईसाहेब पाशिलकर,कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सुरेश मगर,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख,रोहिदास पाशिलकर यांनी जाधव यांच्या निधनाने राजकीय,सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असा शोक व्यक्त केला.जाधव यांच्या पश्चात पत्नी,मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रीया उत्तरकार्य विधी शनिवार २९ ऑगस्ट रोजी धाटाव येथील राहत्या घरी करण्यात येणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.