Press "Enter" to skip to content

आवरे येथील आदर्श शिक्षक द ना गावंड गुरुजी यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / निवास गावंड / उरण #💠✳️🔷🔶


उरण पूर्व विभागातील मौजे आवरे येथील आदर्श शिक्षक द .ना . गावंड गुरुजी यांचे 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वतंत्र दिवशी वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

द ना गावंड गुरुजी हे फक्त अध्यपणच नाही तर संपुर्ण कला क्षेत्र यात कमालीचे पारंगत होते व्यंकोजी वाघ , वाघ दारीचा वेढा पडलं अश्या नाटकात पोपटलाल ची भूमिका साकारून अतिशय प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे विनोदाचे बादशाह होते.

स्वर्गीय दशरथ नारायण गावंड .( या ना प्रेमाने द. ना .गावंड गुरुजी असे म्हणत )यांना अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली आणि आवरे गावाचे तसेच एक पंचक्रोशोतील शिक्षणचे द्रोणाचार्य हरपले…अष्टपैलू व्यक्तीमत्व,,.. चित्रकार,..सुंदर हस्ताक्षराचा नजारा…. वक्ते. . शिकविण्याची एक वेगळीच शैली…इतिहासात आपल्या विविध पैल्लू चा वापर करत सुंदर पध्दतीने इतिहास व विविध विषय विद्यार्थी शिकवीत असतत विद्यार्थी प्रिय..समाजप्रिय… सर्वगुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्व असणारे… आवरे गावात शेकडो आदर्श व गुणवंत विद्यार्थी घडविणारे गुरुजी म्हणून द .ना . गावंड गुरुजी यांचे आदराने नाव घेतात.. . आवरे गाव व पंचक्रोशीत अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शिक्षकनेते द ना गावंड गुरुजी हे सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक समारंभात हिर हिरीने सहभागी होणारे शिक्षक नेते सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्तीनंतर
त्यांच्या जाण्याने न शिक्षण क्षेत्रातील अतोनात नुकसान झालं आहे श्री स्वर्गीय डी एन गुरुजी यांचा दशक्रिया विधी सोमवार दि 24/08/2020 रोजी श्री क्षेत्र ब्राम्हण देव मंदिर येथे होणार असून उत्तर कार्य बुधवार दि 26/08/2020 रोजी आवरे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.